Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeदेश विदेशस्वतःला चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं

स्वतःला चायवाला सांगून मोदींनी देशाला मूर्ख बनवलं


नवी दिल्ली (वृत्तसेवा):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर जीएसटीवरुन टीका केली. करोना आणि लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या व्यापार्‍यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली.’ नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल, असं म्हणत प्रल्हाद मोदी यांनी व्यापार्‍यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला होता. नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात; ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!