बीड(रिपोर्टर): पोटाच्या आजारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका चाळीस वर्षीय रुग्णाने खिडकीला गळफास गेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
बाळू बहिर रा.नवगण राजुरी (वय 40) याला पोटाचा आजार होता, तो 28 मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.रात्रीच्या दरम्यान त्याने रुग्णालयातील खिडकीला गळफास घेवून आत्महत्या केली. हा आत्महत्येचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला आहे.