Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडसाहित्यरत्नासोबत अण्णांच्या नावाआधी भारतरत्न लागावे -ना.मुंडे

साहित्यरत्नासोबत अण्णांच्या नावाआधी भारतरत्न लागावे -ना.मुंडे


बीड (रिपोर्टर):- अण्णांच्या नावा आधी भारतरत्न लागावे यासाठी यश मिळेपर्यंत प्रयत्नशिल राहू असं म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. वंचित सुशिक्षितांची वाणीने आपल्या अजरामर साहित्यातून शब्दबद्ध करून सर्वांसाठी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलेले साहित्यरत्नाला नमन करतो असे म्हणत धनंजय मुंडेंनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं याचा पुर्नउच्चार केला.
डपावर थाप मारत मरगळलेल्या, झोपलेल्या समाजाला जागे करणारे, शब्दाचे रत्न आणि शब्दाचे शस्त्र आपल्या साहित्यातून बनविणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. कष्टकर्‍यांसाठी आणि शोषितांसाठी आपला देह चंदनासारखा झिजवणारे अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत अण्णाभाऊंना अभिवादन केले. यावेळी मुंडे यांनी साहित्यरत्न सोबतच अण्णांच्या नावाआधी भारतरत्न लागावे यासाठी यश मिळेपर्यंत प्रयत्नशिल राहू असेही म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!