Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा रूग्णालयात येणार्‍या नातेवाईकांची होणार अँटीजेन टेस्ट

जिल्हा रूग्णालयात येणार्‍या नातेवाईकांची होणार अँटीजेन टेस्ट

बीड (रिपोर्टर);- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांनी रूग्णालय परिसरामध्ये येणार्‍या रूग्णांच्या नातेवाईकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रूग्णांना भेटण्यासाठी आता पास लागणार आहे. पासशिवाय रूग्णांना भेटता येणार नाही. बीड जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्नाची पराकाष्टा करत आहे. जिल्हा रूग्णालयामध्ये दररोज अनेक रूग्णांच्या नातेवाईकांची ये-जा होत असते. रूग्णालयाच्या आवारामध्ये येणार्‍या रूग्णांच्या नातेवाईकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांनी घेतला आहे. आता दररोज अँटीजेन टेस्ट केल्यानंतरच रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णालय परिसरामध्ये जाता येणार आहे. त्याचबरोबर रूग्णांना भेटण्यासाठी पास गरजेचा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!