Wednesday, September 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedसतिश चव्हाण हे 'सच्चे' उमेदवार, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्याने योगदान -...

सतिश चव्हाण हे ‘सच्चे’ उमेदवार, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्याने योगदान – धनंजय मुंडे

उदगीर – : ‘सच का साथ, सबका विकास’ हे ब्रीद वाक्य घेऊन महाविकास आघाडीकडून तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले सतीश चव्हाण हे ‘सच्चे उमेदवार असून, पदवीधर, विद्यार्थी यांच्या शैक्षणिक, रोजगार यासह शेती, सिंचन अशा अनेकविध प्रश्नांवरील त्यांच्या आजपर्यंतच्या कामाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित पदवीधर मेळावा व जाहीर सभेत श्री मुंडे बोलत होते. पुढे बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की निवडणुकी आधीच आत्मविश्वास गमावलेल्या विरोधकांचा निभाव लागणार नाही; विरोधकांमधील उमेदवारीचा गोंधळ, अंतर्गत बंडाळी आदी बाबींवरही लक्ष वेधत श्री.मुंडे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. मराठवाडयातील सर्व जनतेला ओळख असणारा आमदार म्हणजे सतीश चव्हाण आहेत.कारण ज्यांनी जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली आहे.त्यांचे कष्ट त्यांचे काम हीच त्यांची ओळख आहे.ते मराठवाड्यातील अनेक प्रश्र्न अतिशय तळमळीने सभागृहात मांडतात. नेटसेटधारकांचा प्रश्र्न असो की, मराठवाड्यातील पाणी प्रश्र्न असो,विना अनुदानित शाळा, महाविद्यालयाचा प्रश्र्न, औरंगाबादला लाॅ विद्यापीठाची मागणी या मराठवाड्यातील विकासासाठी लढणारा लढवय्या उमेदवार सतीश चव्हाण आहेत.अशा सर्वसामान्य माणसाविषयी काम करणाऱ्या सतीश चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून द्या असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले.या जाहीर मेळाव्यास ना. मुंडे यांच्यासह राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, बसवराज पाटील नागराळकर, विजयकुमार पाटील, सिद्धेश्वर पाटील, कल्याण पाटील, शिवाजीराव मुळे, रामराव बिरादार, मिनाक्षी ताई शिंगडे, चंदन पाटील, भरत चामले, समीर शेख, सुनील केंद्रे, मंजूर खान पठाण, नवनाथ गायकवाड , दीपालीताई औटे, उषाताई कांबळे, सुदर्शन मुंडे, अर्जुन आगलावे, विठ्ठल चव्हाण, विनायक जाधव, रामराव राठोड, चंद्रकांत टेंगटोल, डी के मोरे, मामा सोनवणे, प्रवीण भोळे आदींसह उदगीर तालुका व परिसरातील पदवीधर – शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!