Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडकृषी अधिकार्‍यांने शेतकर्‍यांची बैठक बोलावली अन् स्वत:च पळ काढला

कृषी अधिकार्‍यांने शेतकर्‍यांची बैठक बोलावली अन् स्वत:च पळ काढला

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांना 2020-21 च्या खरीप हंगामाचा पीक विमा मिळाला नसून या पीक विम्यासाठी 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर गंगाभीषण थावरे यांनी मोर्चा आयोजन केले. मोर्चा काढू नका, आपण चर्चा करू असे पत्र थावरे यांना जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने पाठवून आज सकाळी 11 वाजता कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला अधिकार्‍यांनी दांडी मारून स्वत:च पळ काढल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात होता. संतापलेल्या गंगाभीषण थावरेंसह इतरांनी कार्यालयासमोर बोंबा ठोकून कृषी विभागाचा निषेध केला. ऑगस्टला मोर्चा काढणार असल्याचा निर्धार थावरे यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातल्या हजारो शेतकर्‍यांनी 2020-21 चा खरीप हंगामाचा विमा भरला होता. सदरील विम्याची रक्कम देण्यात यावी यासाठी 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा काढू नये, आपण बसून चर्चा करू असे पत्र जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने थावरे यांना दिले होते. त्यासाठी आज सकाळी 11.30 वाजता बैठकीचे आयोजन केले होते मात्र बैठकीला अधिक्षक कृषी अधिकारी हजर राहिले नाही. त्यामुळे बैठकीसाठी आलेल्या शेतकर्‍यात संताप व्यक्त करण्यात आला. कृषी अधिकारी बैठकीच्या वेळी अंबाजोगाईला निघून गेले. अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने गंगाभीषण थावरेंसह इतर शेतकर्‍यांनी कार्यालयासमोर बोंबा ठोकून कृषी विभागाचा निषेध केला. नियोजनानुसार 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार असल्याचे थावरे यांनी म्हटले आहे

Most Popular

error: Content is protected !!