Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमगढीत जुगार अड्ड्यावर छापा 13 जुगारी ताब्यात, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

गढीत जुगार अड्ड्यावर छापा 13 जुगारी ताब्यात, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त


बीड (रिपोर्टर):- गढी परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एसपींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर काल संध्याकाळी त्या ठिकाणी धाड याकली असता तिर्रट नावाचा जुगार खेळताना 13 जुगारी पोलिसांनी पकडून त्यांच्याविरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या वेळी पोलिसांनी 2 लाख 4 हजार 670 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.


गढीपासून जवळ असलेल्या निपाणीजवळका रोडवर हॉटेल शुभमच्या पाठिमागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एसपींचे विशेष पथक प्रमुख ए.पी.आय. विलास हजारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह काल त्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी तिर्रट नावाचा जुगार खेळताना जुगारी नवनाथ प्रभाकर बारगजे (रा. वडगाव), समीर महंमद सय्यद (रा. वडगाव), कर्नयाल विठ्ठल यादव (रा. बुर्‍हानपूर), बाबासाहेब चंद्रभान माने (रा. निपाणीजवळका), अशोक सुदाम माने (रा. निपाणीजवळका), प्रदीप शहादेव ढाकणे (रा. वडगाव), सुधाकर अंकुश काकडे (रा. निपाणी जवळका), गणेश साहेबराव गायकवाड (रा. गढी), विठ्ठल जीवन चौधरी (रा. निपाणीजवळका), भाऊसाहेब श्रीराम राठोड (रा. निपाणीजवळका), सुभाष तुकाराम ढाकणे (रा.मिरकाळा), सर्जेराव बाजीराव झिटे (रा. कुंभारवाडी), काकडे शिवप्रसाद भगवान (रा. निपाणीजवळका) हे तेरा जुगारी त्या ठिकाणी जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून तिर्रट जुगाराच्या साहित्यासह नगदी 42 हजार 170 रुपये, मोबाईल, दुचाकी असा एकूण 2 लाख 4 हजार 670 रुपयांचा ऐवज जप्त केला

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!