Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमलोक अदालतीमध्ये 1 कोटी 49 लाख 2 हजार 673 रुपयांची वसुली 283...

लोक अदालतीमध्ये 1 कोटी 49 लाख 2 हजार 673 रुपयांची वसुली 283 प्रकरणे तडजोडीने निकाली


गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुका विधी सेवा समिती आणि गेवराई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि.01 ऑगस्ट 2021 रोजी गेवराई न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाची 2664 प्रकरणे तसेच 860 दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित 153 दिवाणी 32 फौजदारी तसेच 98 दाखलपुर्व प्रकरणे असे एकुण 283 प्रकरणे निकाली निघाली. तर या लोक अदालतीमध्ये प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणात 1 कोटी 49 लाख 2 हजार 763 रुपये वसुली करण्यात आली.


महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई , व बीड जिल्हा विधी सेवा समिती प्राधिकरण यांचे निर्देशानुसार गेवराई तालुका विधी सेवा समिती आणि गेवराई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि.01 ऑगस्ट 2021 रोजी गेवराई न्यायालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. या लोकअदालतीत चार पॅनल करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणुन गेवराई दिवाणी न्यायाधीश क्र.स्तर सौ.एम.पी.एखे सहदिवाणी न्यायाधीश एस.एम.घुले 2 रे सह दिवाणी न्यायाधीश एस.के. देवकर व 3 रे सह दिवाणी न्यायाधीश सौ.एस.आर शिंदे यांनी काम पाहीले. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत दिवाणी दावे, दाखल पुर्व प्रकरणे बँक कर्ज प्रकरणे धनादेशाचे प्रकरणे, घरगुती कौटुबिक वाद ग्रामपंचायत थकबाकी प्रकरणे, पोटगी , प्रकरणे व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आपसात मिटवून या लोक अदालतीमध्ये 1 कोटी 49 लाख 2 हजार 673 रुपयांची वसुली सह 283 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कोवीड -1 9 बाबतच्या सर्व नियमाचे पालन करण्यात आले. व ही लोकअदालत यशस्वी होणेसाठी सर्व न्यायाधीश , वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.अमित राम मुळे व वकील संघाचे सर्व पदअधिकारी सदस्य, पोलिस प्रशासन आरोग्य प्रशासन, नगर पालिका प्रशासन व न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Most Popular

error: Content is protected !!