Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमहिला कर्मचार्‍याकडून पुरग्रस्तास 10 हजाराची मदत

महिला कर्मचार्‍याकडून पुरग्रस्तास 10 हजाराची मदत


बीड (रिपोर्टर):- कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरग्रस्त भागाचे पुनवर्सन करण्यासाठी सर्वस्तरातून मदत केली जात आहे. बीड येथील समाजकल्याण कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्‍याने दहा हजार रुपयांची मदत जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी कोकणात पुराने अनेकजण मरण पावले. कित्येकांचे घरे उद्ध्वस्त झाले. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यभरातून मदत केली जात आहे. बीड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत असणार्‍या शिला चव्हाण यांनी आपला मुलगा कै. महादेव शिवाजी चव्हाण याच्या स्मरणार्थ 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. सदरील ही मदत जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी सुभाष लोणके, सुनिल पाटोळे, सुधाकर धुरंधरे यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!