Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडबीड जिल्ह्यातील दहा जिनिंग सुरू होणार

बीड जिल्ह्यातील दहा जिनिंग सुरू होणार


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या अंतर्गत दहा जिनिंग सुरू करण्यात येत असून ज्या शेतकर्‍याने आपल्या कापूस विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नोंदणी केली आहे अशा शेतकर्‍यांना आज संध्याकाळपासून कापुस विक्रीसाठी संदेश येतील. त्यानंतर या शेतकर्‍याने आपला कापूस या जिनिंगवर घेवून जावयाचा आहे. ज्या दहा जिनिंग सुरू होत आहेत त्या जिनिंगवर इतर जिल्ह्यातील कापूस आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी  यांनी म्हटले आहे.
काल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, फेडरेशनचे विभागीय व्यवस्थापक यांच्या समवेतत बैठक घेवून शेतकर्‍याचा कापूस खरेदी करण्यासाठी नियोजन केले. यामध्ये पहिल्या टप्प्यात सीसीआय अंतर्गत बीड जिल्ह्यातील चार जिनिंग, गेवराई तालुका चार जिनिंग, वडवणी तालुका 2 जिनिंग पहिल्या टप्प्यात सुरूवात होत आहे. यामध्ये आजपासून बीड आणि गेवराईतील जिनिंग सुरूवात होत ऊन वडवणी तालुक्यातील दोन जिनिंग या 26 तारखेपासून सुरू करण्यात येत आहेत. तर दुसर्‍या टप्प्यात धारूर तालुक्यातील जिनिंग सुरू करण्यात येणार आहे. धारूर तुलक्यातील जिनिंग या सीसीआय अंतर्गत चालू करायच्या की फेडरेशनमार्फत याबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही. मात्र ज्या धारूर तालुक्यातील जिनिंग सुरू करावयाच्या आहेत त्या जिनिंगला परळी, केज, धारूर या तालुक्यातील शेतकरी जोडलेले आहेत. तर बीड तालुक्यातील ज्या चार जिनिंग सुरू केल्या आहेत. त्या जिनिंगला आष्टी, रिूर आणि बीड या तीन तालुक्यातील शेकर्‍यांनी आलप्या कडील कापूस शासकीय भावाने विक्री करावयाचा आहे. ज्या दहा जिनिंग सुरूवात होत आहे त्या जिनिंगवर जिनिग चालकाने दुसर्‍या जिल्ह्यातील किंवा व्यापार्‍यांचा कापुस घेतल्यास त्यांच्या कडक कारवाई करण्यात येईल. या बाबीवर ही लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी सीसीआयचे विभागीय वयवस्थापक प्रविण दुवे यांना दिले. कालच्या बैठकीला दुवे यांच्यासह बीड रेाविभागीय व्यवस्थापक इंगळे, जिल्हाधिकाी फडणवीस आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील हे उपस्थित होते. 

Most Popular

error: Content is protected !!