Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमग्रामीण बँकेच्या कर्मचार्‍यास मारहाण कारवाई करण्यासाठी सर्व बँकेचे कर्मचारी जिल्हाधिकार्‍यांकडे

ग्रामीण बँकेच्या कर्मचार्‍यास मारहाण कारवाई करण्यासाठी सर्व बँकेचे कर्मचारी जिल्हाधिकार्‍यांकडे


बीड (रिपोर्टर):- परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ग्रामीण बँकेच्या एका कर्मचार्‍यास मारहाण करण्यात आली. मारहाण करूनही या कर्मचार्‍यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. कर्मचार्‍यास मारहाण करणार्‍यांविरोधात कारवाई न झाल्यास उद्यापासून बँका बंद ठेवण्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला.
पीक कर्जाच्या कारणावरून सिरसाळा ग्रामीण बँकेतील अर्धापुरकर या कर्मचार्‍यास काल मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर त्या कर्मचार्‍यावर संबंधिताने खोटा गुन्हा दाखल केला. कर्मचार्‍यास मारहाण करणार्‍याविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी ग्रामीण बँकेसह सर्व बँकेच्या कर्मचार्‍यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. या वेळी बी.पी. संतोष, लिड बँकेचे कदम यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दोषी व्यक्ती विरोधात कारवाई न केल्यास उद्यापासून बँका बंद ठेवण्याचा इशारा या कर्मचार्‍यांनी दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!