Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमगळफास घेऊन इसमाची आत्महत्या

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

बीड (रिपोर्टर):- एका 32 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल तीनच्या दरम्यान धारूर येथील तादंळवाडी रोड परिसरात घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शव ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवला.
भूषण सुरेश माने (वय 32, रा. बीड ह.मु. तांदळवाडी रोड धारूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. भूषण माने यांची धारूर ही सासरवाडी असून ते सध्या धारूरमध्ये राहत होते. त्यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती धारूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्तळी पोहचून पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!