Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईममनसुख हिरेन हत्या प्रकरणात मोठा खुलासा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मोठा खुलासा


नवी दिल्ली (वृत्तसेवा):- मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा समोर आला आहे. मंगळवारी न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (छखअ) सांगितले की, मनसुखला ठार मारण्यासाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांची वेळ मागितली आहे.


9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. एनआयएचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पैसे कोणी दिले हे शोधण्याची गरज आहे. तपास यंत्रणेने असेही सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने तपासासाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!