बीड (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील शेतकर्यांसह अन्य एका शेतकर्यांच्या खात्यातून ऑनलाइन रक्कम हडपणार्या एका सायबर भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन गुन्ह्यातील 86 हजार रूपये रक्कमही तक्रारदाराला परत करण्यात आली आहे. बीड सायबर पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे. सदरचा भामटा हा बुलठाणा जिल्हातील मालकापूरचा आहे .
डिजिटल जमान्यात आत पैश्याचा व्यवहार हा ऑनलाईन होत आहे . अश्या वेळी अर्धवट ज्ञान म्हणा अथवा अन्य काही अमिषाला बळी पडून अनेकांची फसवणूक केली जात आहे. ऑनलाईन गंडा घालणाऱयांची मोठी टोळीच राज्य आणि देशभरात सक्रिय आहे त्या मुळे गरिबा पासून श्रीमंता पर्यंत आणि शेतकर्या पासून व्यापार्यापर्यंत फसवणूक होताना दिसून येते अश्या गंभीर परिस्थितीत बीडचे सायबर विभाग भामट्यांवर नजर ठेऊन आहे दाखल तक्रारीची गंभीर दाखल घेत त्या भामट्याचा शोध बीड सायबर घेते . शेतकरी राजभाऊ दिनकर पानगुडे (रा. रूई, ता. धारूर) यांचे 7 ते 13 ऑक्टोबर 2022 या दरम्यान खात्यावरून 56 हजार रुपये गायब झाले होते. याप्रकरणी 5 डिसेंबर 2022 रोजी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो सायबर ठाण्यात वर्ग करण्यात आला. यात पोलिसांनी योग्य तपास करत गणेश खरसाने (25, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) याला गावात जाऊन बेड्या ठोकल्या. त्याने वेगवेगळ्या माध्यमातून खर्च केलेले 56 हजार रूपये वसूल करून जप्त करण्यात आले. संबंधित शेतकर्याला हे पैसेही परत करण्यात आले.