Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात आज 62 कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज 62 कोरोना पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- आज बीड जिल्ह्यामध्ये 1 हजार 819 लोकांची कोरोना टेस्ट केली त्यामध्ये 62 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 1 हजार 757 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा रेट स्थिर आहे. आज आलेल्या अहवालांमध्ये अंबाजोगाई 15, बीड 11, आष्टी 19, धारूर 4, माजलगाव 2, परळी 2, पाटोदा 1, शिरूर 5 असे हे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तालुकावाईज रुग्णांची संख्या आहे.
कोरोनाचा पॉझिटिव्ह येण्याचा रेट जरी स्थिर असला तरी लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे. आता आजपासून जिल्ह्यामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यांची ही भर या करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 26 माध्यमिक शिक्षक हे करोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
0000

Most Popular

error: Content is protected !!