Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमचुंबळीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या छेडछाडीमुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप पोलिसात अद्यापही गुन्हा...

चुंबळीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या छेडछाडीमुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल नाही


मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईला पाठवला

बीड/पाटोदा (रिपोर्टर):- पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला. मुलाच्या छेडछाडीवरून मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. घटनास्थळी बीड आणि पाटोद्याचे पोलिस दाखल झाले होते. दुपारी बारा वाजेपर्यंत मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला होता.


आयशा युसुफ पठाण या मुलीच्या घरातील लोक काल एका लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. सदरील मुलगी एकटीच घरी होती. घरातील सदस्य लग्नाहून परत आल्यानंतर त्यांना आयशाचा मृतदेह घरातील पत्र्याच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती पाटोदा पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्याचबरोबर बीड पोलिसही चुंबळी येथे दाखल झाले होते. सदरील मुलीने छेडछाडीमुळे आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांकडून सांगितले जात असले तरी याबाबत मात्र अद्यापही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून काही पाटोदा येथील नागरिक रात्री पाटोदा पोलिस ठाण्यामध्ये गेले होते, असेही सांगण्यात आले. मयत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र दुपारपर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते. शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल करू, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी जमादार तांदळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!