Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeबीडकेजचौसाळ्यात सोयाबीनच्या भावावरून व्यापार्‍यास मारहाण,व्यापार्‍यांचा आज बंद

चौसाळ्यात सोयाबीनच्या भावावरून व्यापार्‍यास मारहाण,व्यापार्‍यांचा आज बंद


गावात पोलिस बंदोबस्त
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
नेकनूर (रिपोर्टर)- सोयाबीनच्या भावावरून एका व्यापार्‍यास सात ते आठ जणांनी मारहाण करत त्याच्याकडील साठ हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना काल चौसाळा येथे घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ चौसाळा येथील व्यापार्‍यांनी आज आपले व्यवहार बंद ठेवले होते. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपीविरोधात कठोर करवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापार्‍यांच्या वतीने करण्यात आली.
प्रशांत लहू चौधरे (वय 25) यांची चौसाळा येथे समर्थ ट्रेडर्स नावाची आडत दुकान आहे. या दुकानावर अंधापुरी येथील समाधान रावसाहेब जगताप, पप्पू रावसाहेब जगतापसह आठ जण आले होते. त्यांनी चौधरे यांच्याकडे सोयाबीनच्या भावाबाबत विचारपूस केली. तुमच्याकडे सोयाबीनला भाव कमी आहे, असे म्हणत वादविवाद झाले. यातच प्रशांत चौधरे यास मारहाण करण्यात आली व त्यांच्या दुकानातील साठ हजार रुपये हिसकावून घेतले. या प्रकरणी समाधान जगताप, पप्पू जगतापसह आठ लोकांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय विलास जाधव, जायभाये, घोलप हे करत आहेत. मारहाणीच्या निषेधार्थ आज चौसाळा येथील व्यापार्‍यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवलेले होते. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापार्‍यांच्या वतीने करण्यात आली. बंदच्या अनुषंगाने गावामध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!