Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमपरळीत एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न नाथ चित्रपटगृहासमोर घडली घटना

परळीत एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न नाथ चित्रपटगृहासमोर घडली घटना


परळी (रिपोर्टर):- एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. एटीएम फुटले नसल्याने आतील पैसे वाचले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परळी शहरामध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
एसबीआय बँकेचे नाथ चित्रपटगृहासमोर एटीएम आहे. अज्ञात चोरट्याने सदरील हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडण्याच्या नादात मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एटीएम फुटले नसल्याने आतील रक्कम वाचली. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचेही या वेळी चोरट्यांनी नुकसान केले. या प्रकरणी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, अशोक खरात, मोहन जाधव, घटमल, भताने या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!