Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeराजकारणमहापालिकेच्या निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार

महापालिकेच्या निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढवणार


मुंबई (रिपोर्टर):- मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांतील आगामी निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेनं नाशिकची महापालिका निवडणुकीची सूत्रे अमित ठाकरे यांच्याकडं सोपवल्यानंतर आता शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईचा गड राखण्याची जबाबदारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या निमित्तानं आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व ठळकपणे पुढं आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.


भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर आणि राज्यात शिवसेना-कॉंग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्याच्या सत्तेतून बाहेर ढकलल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर कमालीचा नाराज आहे. मुंबईची सत्ता ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्यायचं, अशी रणनीती भाजपनं आखली आहे. त्यासाठी पडद्यामागे सर्व प्रकारची मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेला सोबत घेण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनंही वातावरण निर्मिती केली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा गड राखणं हे शिवसेनेपुढं आव्हान असणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!