गोपाळपूर शाळेचे पत्रे उडाले, शहरातील बॅनर फाटले; आंब्याचे मोठे नुकसान
किल्ले धारूर (रिपोर्टर): धारुर शहर व तालुक्यामध्ये पाऊस व वादळी वार्याने काल कहर केला या वादळी वार्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे तालुक्यातील गोपाळपूर येथील शाळेचे पत्रे वार्याने अँगल सह उडाले. तर शहरामध्ये विविध ठिकाणच्या पाट्या , बॅनर बसस्थानकामधील लावले जाणारे बॅनरची मोठी फ्रेम अँगल सह उडून बाजूला पडले आहेत.
काल सायंकाळच्या वेळी अचानक सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाला वादळी वारा व पावसामध्ये तालुक्यातील व शहरातील मोठे नुकसान झाले आहे वार्याचा वेग खूप जास्त असल्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावरती पडली तर धारूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाळपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्राचे शेड वर्गावरील पूर्णतः उडून बाजूला पडले .यामुळे आता पंधरा तारखेला शाळा सुरू होणार असून आता इतक्या लवकर दुरुस्त कसे करावे असा मोठा प्रश्नही शिक्षकांसमोर उभा टाकला आहे परंतु येथील शिक्षक अशोक मुंडे , नामदेव लांब हे दुरुस्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत तर धारूर शहरांमध्ये (पान 7 वर)
विविध ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते. परंतु वादळी वार्यामध्ये सर्व बॅनर दुकानाच्या पाट्या उडून बाजूला पडले आहेत यामध्ये खूप मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे बहरलेला आंबाही वादळी वार्यामध्ये खाली पडला आहे त्यामुळे बळीराजाची संकट देखील आता वाढलेले आहे कापूस ,सोयाबीन यांनी दगा दिल्यानंतर आता हाता तोंडाशी आलेले आंब्याचे फळही वादळी वार्याने हिरावून नेले आहे