Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमवरवटीत दोन गट आमने सामने भिडले एक गंभीर जखमी, ग्रामीण पोलीसात गुन्हा...

वरवटीत दोन गट आमने सामने भिडले एक गंभीर जखमी, ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)ः- सामाईकविहीरीचे विद्युत बिल भरण्याच्या कारणावरुन वरवटीत दोन गट आमने सामने आले. यावेळी झालेल्या हातापायीत एक जण गंभीर जखमी झाला असून गंभीरवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी नितीन गहीणीनाथ खोटे यांच्या फिर्यादीवरुन तिघां जणांविरोधात ३०७ चा गुन्हा ग्रामीण पोलीसात दाखल करण्यात आला आहे.
सामायीक विहरीचे लाईट बिल भरण्याचे कारण काढून लक्ष्मण कोंडीबा खोटे, बालाजी लक्ष्मण खोटे, अरविंद लक्ष्मण खोटे सर्व रा.वरवटी ता.बीड यांनी संगनमत करुन फिर्यादी नितीन गहीणीनाथ खोटे व त्यांचे वडील गहीणीनाथ खोटे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत नितीन याचा भाऊ जयदत्त यास आरोपीने लाकडी दांड्याने पाठीत मारुन गंभीर जखमी केले. व त्यास जिवे मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर कत्तीने वार करत असतांना तो वार जयदत्तने हातावर झेलल्याने डाव्या हाताने गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीने त्यास जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याची फिर्याद नितीन खोटे यांनी ग्रामीण पोलीसांना दिल्याने या प्रकरणी आरोपी विरोधात कलम ३०७, ३२३, ५०५, ५०६,३४ भादवी नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास रोटे हे करत आहे.

Most Popular

error: Content is protected !!