Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांचा कलेक्टर कचेरीवर बैलगाडी मोर्चा २०२०-२१ चा खरीप हंगामाचा पिकविमा द्या, मोर्चाने...

शेतकर्‍यांचा कलेक्टर कचेरीवर बैलगाडी मोर्चा २०२०-२१ चा खरीप हंगामाचा पिकविमा द्या, मोर्चाने नगर रोड दणाणले


बीड (रिपोर्टर)ः- २०२०-२१ साली बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीपाचा विमा भरला होता. मात्र या विम्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळाला नाही. शेतकर्‍यांचे नुकसान होवूनही शेतकर्‍यांना विमा न देणे म्हणजे शेतकर्‍यांची ही आर्थीक लूट आहे. विम्यासाठी आज शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाने नगर रोड दणाणून गेले होते.

234748239 323402682906559 5230059643965765348 n


पिक विम्याचे शेतकर्‍यांना कवच असते. मात्र विम्या कंपन्या शेतकर्‍यांना विमा देत नसल्याने शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. २०२०-२१ साली ऍग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनीने जिल्हाभरातील शेतकर्‍यांचा विमा भरुन घेतला. शेतकर्‍यांचे खरीप पिकाचे १०० टक्के नूकसान झाले. नूकसानीनंतर शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मिळायला हवी होती. मात्र कंपनीने शेतकर्‍यांना विमा दिला नाही. विमा संदर्भात अनेक वेळा आंदोलन केले,

233769926 2871552466443571 1342643695560740599 n

निवेदन दिले तरीही शासन विमा कंपनीवर कसलाही प्रकारचा दबाव आणत नसल्यानेच विमा कंपनी शेतकर्‍यांना विमा देण्यास नकार देत आहे. कंपनीने तात्काळ विम्याची रक्कम शेतकर्‍यांना द्यावी यासह इतर मागण्यासाठी आज शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक शेतकर्‍यांचा सहभाग होता. सदरील हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघाला होता. आंदोलनकर्ते शेतकर्‍यांनी विमा कंपनीच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनाने नगर रोड दणाणून गेले होते.

Most Popular

error: Content is protected !!