Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाजिल्हावासियांच्या आरोग्यासाठी डॉ. साबळेंचा जागता पहारा, तिसर्‍या लाटेचे आव्हान स्वीकारायला उपाययोजनांचे कडे

जिल्हावासियांच्या आरोग्यासाठी डॉ. साबळेंचा जागता पहारा, तिसर्‍या लाटेचे आव्हान स्वीकारायला उपाययोजनांचे कडे

६६० राखीव बेडसह अंबाजोगाई, बीड रुग्णालयात प्रत्येकी ५० आयसीयू बेड, नॉनकोविड रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू, दिव्यांगांचा प्रश्‍न सोडविला, उपजिल्हा रुग्णालयात नॉनकोविड पेशंटवर अत्यावश्यक शस्त्रक्रिया, जिल्हा रुग्णालयात कोरोना पेशंटकडे येणार्‍या नातेवाईकांची कोरोना चाचणी
बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालयात जागता पहारा ठेवला असून नॉनकोविड रुग्णांनाही तात्काळ उपचार देण्याबाबत संबंधित डॉक्टरांना सुचना दिल्या आहेत. गेल्या तीन महिन्याच्या कालखंडात डॉ. साबळेंनी जिल्हा रुग्णालयाचा चार्ज घेतल्यानंतर कोविडसह नॉनकोविड रुग्णालयात प्रचंड बदल करून रुग्णांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. डॉ. साबळेंच्या या जागत्या पहार्‍याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

beed civi 2


सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सतर्क आणि जागरुक राहणं नितांत गरजेचं आहे. अशा स्थितीत जिल्हा रुग्णालयात केवळ कोरोना रुग्णांकडे लक्ष दिलं जायचं मात्र नॉन कोविड रुग्णालय जे की आदित्य डेंटल कॉलेजमध्ये सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष केले जायचे मात्र गेल्या तीन महिन्यांपुर्वी जिल्हा शल्यचिकित्सकपदी रुजू झालेले डॉ. सुरेश साबळेंनी आरोग्य सेवेत प्रचंड बदल करून कोविडसह नॉन कोविड रुग्णांना उपचार कसे मिळतील याकडे लक्ष दिलं आहे. कोविड रुग्णांसाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्या समित्यांवर वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष रोज राऊंड करत रुग्णांच्या आरोग्याची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक करतात एवढेच नव्हे तर आदित्यमध्ये सुरू असलेल्या रुग्णालयातही रोज सकाळी जाऊन राऊंड मारतात. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे नॉनकोविड रुग्णांसाठी उपचार आणि शस्त्रक्रिया सुरू केल्या. दिव्यांगांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले प्रमाणपत्र सुरू करण्यात आले असून कोविड योद्धे असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांसह पत्रकार व अन्य कर्मचार्‍यांच्या आरोग्य तपासण्या साबळे यांनी करून घेतल्या आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी येणार्‍या नातेवाईकांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. कोविडचे समुळ उच्चाटन करण्याहेतु जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात चाचण्या वाढविल्या आहेत. राज्यातलं बीड जिल्हा रुग्णालय असा पहिला शासकीय रुग्णालय असेल जेथे म्युकर मायकोसिसच्या पेशंटवर शस्त्रक्रिया केली जाते. शासकीय खर्चाने दोन विद्यार्थ्यांच्या कानांचे ऑपरेशन साबळे यांच्या कार्यकाळात झाले असून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे आव्हान स्वीकारण्यासाठी ६६० बेड राखीव ठेवून बीड, अंबाजोगाई येथे प्रत्येकी ५० आयसीयू बेड तयार करण्यात आलेले आहेत. डॉ. साबळेंच्या कार्यप्रणालीमुळे जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण प्राथमिक रुग्णालयात आरोग्य सेवा सुरळीत झाली आहे. दस्तुरखुद्द साबळे कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष राऊंड घेतात. त्याचबरोबर बंद असलेल्य शस्त्रक्रियाही नॉन कोविडमध्ये त्यांनी सुरू केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!