Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडधारूरअंबेवडगावच्या सबस्टेशनसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

अंबेवडगावच्या सबस्टेशनसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन


धारूर (रिपोर्टर): पंधरा दिवसांपासून विजपुरवठा खंडीत होऊनही विज वितरण कंपनी विजेचा पुरवठा सुरळीत करत नसल्याने आज संतापलेल्या शेतकर्‍यांनी अंबेवडगाव सबस्टेशनसमोर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
चौंडी, सोनीमोहा, थेटेगव्हाण, चोरांबा इत्यादी गावांचा विज पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून खंडीत झाला आहे. सदरील विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी अंबेवडगावच्या सबस्टेशनसमोर आज शेतकरी ठिय्या मांडून बसून होते. सदरील आंदोलनकर्त्यांना अभियंता पेसलवार, जोगदंड यांनी भेट देऊन शेतकर्‍यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या वेळी मंडल अधिकारी केशव मुंडे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे यांची उपस्थिती होती

Most Popular

error: Content is protected !!