Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीसमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवा

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीसमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवा


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण
ङ्गबीड (रिपोर्टर):- जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणामध्ये अनेक शंभू प्रेमींची उपस्थिती आहे.
जिल्हा परिषदेची भव्यदिव्य नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यापुर्वी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा इमारतीसमोर उभारावा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांपासून इमारतीचे बांधकाम होत असून यापुर्वीच पुतळा का उभारण्यात आला नाही ? असा प्रश्‍न शंभरप्रेमींनी उपस्तित केला आहे. आधी पुर्णाकृती पुतळा उभारावा आणि नंतरच इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजीत करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!