Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईग्रामरोजगार सेवकांचे गेवराई तहसील कार्यालयासमोर धरणे

ग्रामरोजगार सेवकांचे गेवराई तहसील कार्यालयासमोर धरणे


गेवराई (रिपोर्टर):- गेवराई तालुक्यातील एमआयएसवरील अतिरिक्त ग्रामरोजगरा सेवक कमी करून ग्रामपंचायत नांदलगाव येथील अपंग ग्रामरोजगार सेवकास न्याय मिळवून द्यावा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांच्या मोहगमी प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन वर्कऑर्डर द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार संघटनेने विविध मागण्यांसाठी गेवराई तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.


महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियन संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेवराई तालुक्यातील काही ग्रामपंचायत अंतर्गत व राजकीय लोकांनी जाणूनबुजून स्वत:च्या फायद्यासाठी सत्तेचा वापर करून ग्रामपंचायतमध्ये ग्रामरोजगार सेवकांना विचारात न घेता तसेच शासन निर्णयाचा कुठलाही संदर्भ न घेता अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची बोगस निवड करून बोगस कामे केली आहेत. या सर्व प्रकाराला संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक जबाबदार आहेत. हा प्रकार तात्काळ बंद व्हावा. गेवराई तालुक्यातील एमआयएसवरील अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक कमी करून ग्रामपंचायत नांदलगाव येथील अपंग ग्रामरोजगार सेवकाला न्याय मिळावा, येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बोगस ठराव घेऊन अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक म्हणून निवड केलेली रद्द करावी व सुरेश राठोड यांना मानधन वाटप करावे, ग्रामपंचायत मादळमोही, अर्धपिंप्री, धुमेगाव, आम्ला वाहेगाव, वाहेगाव, अंतरवली व इतर ग्रामपंचायतमधील अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक निवड तात्काळ रद्द करून कार्यरत ग्रामरोजगार सेवकांना न्याय द्यावा, रमाई प्रधानमंत्री शबरी घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर पेमेंट तात्काळ करावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियनच्या वतीने तहसील कार्यालय गेवराईसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या वेळी अध्यक्ष भगिरथ पवार, उपाध्यक्ष राजू ढेकळे, सतीश आहेर, सचिव गौतम तुरुकमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!