Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमगजानन बँकेच्या पेठ बीड शाखेला आग संगणक, फर्निचर जळून खाक

गजानन बँकेच्या पेठ बीड शाखेला आग संगणक, फर्निचर जळून खाक

सुदैवाने रोख रकमेसह दागिने लॉकर महत्वाचे कागदपत्र
सुरक्षित
बीड (रिपोर्टर):- शहरातील पेंबीड भागात असलेल्या गजानन बँकेच्या शाखेत रात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने बँकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या आगीत संगणक, फर्निचर मोठ्या प्रमाणावर जळाल्याचे दिसून येते. सुदैवाने बँकेतील रोख रकमेसह लॉकर, सोन्याचे दागिने, महत्वाचे कादपत्रे सुरक्षित आहेत.

घटनेची माहिती कळताच बँकेचे संचालक जगदीश काळे, शेख आणि इन्शूरन्स अधिकार्‍यांनी भेट दिली.
पेठ बीड भागात गजानन बँकेची शाखा आहे. रात्री या शाखेत अचानक शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे बँकेतील संगणकासह फर्निचर मोठ्या प्रमाणावर जळाले. रात्री उशिरा ही आग लागली असावी, आज सकाळी लोकांनी पाहिल्यानंतर बँकेत आग लागल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती संचालक जगदीश काळे, अधिकारी शेख यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा या आगीत बँकेचे संगणक, फर्निचर मोठ्या प्रमाणावर जळाले आहेत. बँकेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र बँकेतील रोख रक्कम, लॉकर, दागिने, महत्वाची कागदपत्रे हे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते. सदरची आग ही शार्ट सर्किटमुळे लागल्याचे बँकेतील सर्व विजेचे साहित्य जळाल्याचे दिसून येते.

Most Popular

error: Content is protected !!