Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमघरात घुसून विवाहित महिलेवर बलात्कार नेकनूरमध्ये घडली घटना आरोपींवर गुन्हा दाखल

घरात घुसून विवाहित महिलेवर बलात्कार नेकनूरमध्ये घडली घटना आरोपींवर गुन्हा दाखल

नेकनूर (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये महिला-मुलींवरील अन्याय-अत्याचारात वाढ होत आहे. नेकनूर येथील २५ वर्षीय महिला घरामध्ये झोपली असता एका आरोपीने घरात घुसून सदरील महिलेच्या पतीस व मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील आरोपी फरार झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये महिला-मुलींवरील अन्याय-अत्याचारात वाढ झाली आहे. नेकनूर येथील २५ वर्षीय महिला रात्री घरामध्ये झोपली असता अविनाश लक्ष्मण पारसे (रा. झोपडपट्टी नेकनूर) हा घरामध्ये घुसला. त्याने महिलेच्या पतीला व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. सदरील हा प्रकार महिलेने आपल्या घरच्या लोकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी अविनाश पारसे याच्या विरोधात कलम ३७६, ४५२, ५०६ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कोळी मॅडम या करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!