Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमवेश्या व्यवसाय करताना महिलेस पकडले शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करताना महिलेस पकडले शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर)- शहरातील नाथनगर, पालवण चौक भागात एका घरामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक यांच्या पथकाला झाल्यानंतर या पथकाने डमी ग्राहक पाठवून याबाबतची खात्री केली. सदरील ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वेश्या व्यवसाय करून घेणार्‍या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले.
बीड शहरामधील पालवण चौकातील नाथनगर या ठिकाणी एका घरामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती एसपींच्या पथकाला झाल्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून या बाबतची खात्री केली. सदरील महिला काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्री पटल्यानंतर या ठिकाणी धाड टाकण्यात आली व एका ४५ वर्षीय ऑण्टीस ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ३ (१), ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पंचनामा एलसीबीचे राऊत यांनी केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!