Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडधारूरचाटगावच्या पाझर तलावाचा सांडवा अज्ञात माथेफिरूने फोडला

चाटगावच्या पाझर तलावाचा सांडवा अज्ञात माथेफिरूने फोडला


हजारो क्युसेस पाणी वाया जात आहे
सांडवा फोडणार्‍यावर कारवाई करा
सांडवा पुन्हा बुझवा, शेतकर्‍यांची मागणी

दिंद्रुड (रिपोर्टर):- दिंद्रुडपासून जवळच असलेल्या धारूर तालुक्यातील मोहखेड रोड नजीकचा चाटगाव पाझर तलावाचा सांडवा सोमवारी रात्री अज्ञाताने फोडल्याने तलावामधून हजारो क्युसेस पाणी वाया जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना चाटगावच्या पाझर तलावातले पाणी सांडवा फोडून वाया घालवणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करत फोडलेला सांडवा तात्काळ बांधण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.


धारूर तालुक्यातील मोहखेड रोड नजीक चाटगाव पाझर तलाव आहे. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आजमितीला उपलब्ध आहे. या पाझर तलावामुळे चाटगाव शिवारासह दिंद्रुड परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळतो. मात्र सोमवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चाटगाव पाझर तलावाचा सांडवा फोडला. त्यामुळे मोठ्या वेगाने तलावामधून हजारो क्युसेस पाणी वाहून जात आहे. अचानक तलावाखालच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने चाटगाव येथील नागरिक भयभीत होत पाऊस नसताना पाणी आले कोठून हे पाहण्यासाठी तलावाच्या दिशेने गेले तेव्हा सांडवा फोडल्याचे निदर्शनास आले. एकीकडे पावसाने दडी मारलेली असताना शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे अज्ञात माथेफिरूने सांडवा फोडून तलावातील पाणी वाया घातल्याचा संताप या भागातील नागरिकात असून ज्याने हा सांडवा फोडला त्याचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
००००

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!