Friday, January 28, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- गुटखा, मटका, वाळूत मोठं अर्थकारण अवैध धंद्यांना राजकीय, प्रशासकीय अश्रय!!

प्रखर- गुटखा, मटका, वाळूत मोठं अर्थकारण अवैध धंद्यांना राजकीय, प्रशासकीय अश्रय!!


अवैध धंद्याच्या बाबतीत बोलावे तितके कमीच आहे. लहान शहरापासून ते मोठया शहरात पर्यंत अवैध धंदे सुरु असतात. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. अवैध धंद्यातूनच माफियागिरी वाढली. मुंबई, पुण्या सारख्या बड्या शहरात अवैध धंद्याची बजबजपुरी आहे. गांजा, चरस, आफिम व अन्य नशेच्या पदार्थाची बड्या शहरात मोठी विक्री होत असते. यातून कोट्यावधीची उलाढाल होते, नशेेचे पदार्थ कोण विक्री करतयं, त्याची कुठे,कुठे विक्री होते याची माहिती पोलिस प्रशानाला नसते असं थोडचं आहे? मुंबईच्या पोलिसांना अवैध धंद्यातून मोठी कमाई मिळते हे सत्य कोणी नाकारु शकतं नाही. मुंबई एक असं शहर आहे, ते शहर रात्र-दिवस जागं असतं. रात्रीच्या दरम्यान, बार, पब, बड्‌े हॉटेल जे की, अय्यांशीचे अड्डे असतात. त्याला तितका लगाम लावला जात नाही. ज्या ठिकाणी, अय्याशीचे अड्डे चालतात. त्या िंठकाणच्या पोलिस अधिकार्‍यांची कमाई काही कमी नसते. अशाच कमाईचा भांडाफोडा गेल्या काही दिवसापुर्वी झाला आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांची आज ही चौकशी होत आहे. यात फक्त देशमुख हेच गुंतले बाकीचे सगळे सहीसलामत आहेत.


जुगार आणि मटका
जुगार खेळू नये असं शहाणपण विचारवंताचं असतं, पण जुगार्‍यांचे पावलं त्याकडे वळतातच. जुगाराच्या नादाने अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करुन घेतली. मुलाबाळांना जुगारी बाप पन्नास रुपयाचं दुध आणत नाही. मात्र जुगाराच्या अड्यावर दहा-दहा हजार रुपये खर्च करतो, अशी मानसीकता जुगार्‍यांची असते. जुगाराचे अड्डे जागोजागी असतात. त्याला काही मर्यादा नाहीत. शहराच्या ठिकाणी जुगाराचे ठरावीक पॉईट असतात. त्या पॉइंटपर्यंत पोलिस जात नाही. कारण पोलिसांना त्या िंंठकाणाहून महिन्याला बंद पाकिट मिळतं. ज्या अडयावरुन काही मिळत नाही. त्या ठिकाणी धाडी पडतात. एकदा धाड पडल्यानंतर दुसर्‍यांदा धाड पडत नाही हे तितकचं विशेष आहे. ज्या प्रमाणे जुगाराचे अड्डे सुरु असतात. त्याच प्रमाणे मटका सुरु आहे. मटक्याचा ‘चटका‘ तरुणापासून ते वयोवृध्दांना असतो. मटक्याचे आकडे चलता,चलता घेतले जातात. मट्‌क्यातून मोठी उलाढाल होते. जो मटक्याचा बडा माफिया असतो. त्याला अनेक पोलिस अधिकारी सांभाळावे लागतात. धाडी पडू नये म्हणुन सगळं काही व्यवस्थीत केलं जातं. ज्या ठिकाणी आणि परिसरात जुगार, मटक्याचे जास्त अड्डे असतात, ते बीट मिळवण्यासाठी किंवा पोलिस ठाणे मिळवण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची ओढ जास्त असते. ज्या वेळी पोलिस अधिकारी,कर्मचार्‍यांच्या बदल्या होतात. तेव्हा बदल्यात मोठी उलाढाल होते, किंवा वरीष्ठ अधिकारी आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांची कमाई असलेल्या ठिकाणी बदली करुन त्याच्या माध्यमातून पैसा कमावत असतात. पोलिस प्रशासनात तत्व, इमानदारी या गोष्टीला तितकं महत्व राहिलं नाही. चांगले अधिकारी, कर्मचारी नाहीत असं नाही, चांगलेही आहेत, त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. जुगाराचे अड्डे काही राजकीय नेत्यांचे असतात. काही अड्डे पुढार्‍यांच्या आर्शिवादाने चालतात. काहींना जुगार अड्डे चालवण्यासाठी पुढार्‍यांची आणि राजकारणाची सावली हवी असते. तत्वापेक्षा पैशाला जास्त महत्व आलं. ‘पैसा हाच सबसे बडा झाला आहे’.


गुट्‌ख्यावर बंदी घालून काय फायदा
आरोग्याचा विचार करुन गुट्‌ख्यावर बंदी घालण्यात आली. गुटख्यावर बंदी घालण्यात आल्यापासून गुटख्याची पहिल्यापासून आता जास्तच विक्री होवू लागली, तीही चढ्या भावाने. गुटखा खाणारांची संख्या कमी झाली नाही. संख्या कमी झाली असती तर लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा खाल्ला नसता. गुटखा खाल्लयाने कॅन्सर होतो हे माहित असतांना लोक गुटखा खातात, म्हणजे आपल्या मरणाला लवकर आमंत्रण देतात. आज कॅन्सरचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढू लागले. त्यात तोंडाच्या कॅन्सरमध्ये सर्वात जास्त वाढ झालेली दिसून येत आहे. गुटखा, तंबाखू खाणारांनाच जास्त प्रमाणात तोंडाचे आजार जडतात. कित्येक तरुण मुलं कॅन्सरचे बळी पडत आहेत. गुटखा खाणे हे काहींना शौक वाटतो, पण त्यातून जे भयंकर आजार होतात, ते झाल्यानंतरच कळतात. बार्शी, मुबंई, पुणे, औरंगाबाद सारख्या शहरात कॅन्सरच्या उपचारासाठी लोकांची मोठी गर्दी असते. गुटखा शरीराची वाट लावतो. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली, पण त्याची अंमलबाजवणी केली जात नाही. गुटखा विकणारांना लोकांच्या आरोग्याचं काही देणं घेणं नसतं. विकणार्‍यापेक्षा खाणारांनी आपल्या आरोग्याचा विचार करायला पाहिजे ते ही करत नाही हे दुर्देव म्हणावं लागेल. गुटखा काही माफिया स्वत: बनवतात. बहुतांश गुटखा इतर राज्यातून महाराष्ट्रात येतो. बर्‍याच वेळा गुटख्याचे टेम्पो,ट्रक पकडले जातात. त्यावर कारवाई होते, पुन्हा तशाच तसे. गुटख्याच्या गाड्या तडजोड करुन सोडून देणारे पोलिस अधिकारी कमी नाहीत. अन्न,औषध प्रशासन ही तितकं अंग झटकून कारवाई करत नाही. त्यांचे हाप्ते ठरलेले असतात. प्रशासनाने इमानदारीने कारवाई केली तर एका ही दुकानावर आणि टपरीवर गुटखा मिळणार नाही, पण इमानदारी दाखवणार कोण हाच आज प्रश्‍न आहे.


वाळूची माफियागिरी
वाळू ही बांधकामासाठी महत्वाची असते. वाळूला सोन्याचा भाव आला. वाळूतून मोठं अर्थकरण होतं. वाळूचं टेंडर मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. वाळूचं टेंडर सर्वसामान्य माणुस किंवा कार्यकर्ता कधीच घेवू शकत नाही. कारण त्याच्या हाती टेंडर कधी लागत नाही. लागलं तरी त्याला परेशान करणारे कमी नसतात. त्यामुळे सर्वसामान्य माणुस या भानगडीत पडत नाही. वाळूत सगळ्या बड्याच ‘हस्त्या’ असतात. वाळू भोवती राजकारण जास्त फिरत असतं. काही जण वाळूचं टेंडर न घेताही वाळूचा उपसा करतात व त्यातून महिन्याला लाखो रुपये कमवतात. काहींनी राजकारण कमी केलं आणि वाळूकडे जास्त लक्ष दिलं. दोन,चार हायवा घ्यायच्या आणि सरळ,सरळ वाळूचा धंदा सुरु करायचा असाच कार्यक्रम राजकारणी,बडे व्यवसायीक आणि भ्रष्ट अधिकार्‍यांनी सुरु केलं. बीडमधून जाणारी गोदावरी नदी. या नदीच्या पात्रातून रात्र-दिवस वाळूचा उपसा होतो. कुठून वाळू उपली जाते हे तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठ्यांना माहित असतं, पण वाळूमाफिया घरपोच पैसे आणुन देतात, म्हणुन सगळेच गप्प असतात. दाखवण्यासाठी एखाद वेळी कारवाई केली जाते. ऐरवी सगळं रान मोकळं असतं. गोदावरी पट्टयातील महसूल विभाग, पोलिस ठाणे मालामाल असतात. कोण कुठं गाडी भरतयं, कधीपासून भरतयं इतकी अचुक माहित महसूल विभागाकडे असते. तरी कारवाई होत नाही. सिंदफणा, बिंदूसरा व इतर नदीच्या पात्रातून वाळूचा बेसुमार उपसा होतो. छोटया नदीतून गाव पातळीवरील माफिया वाळू उपसतात व त्यातून काही भाग महसूल आणि पोलिस कर्मचार्‍यांना देतात. त्यामुळे कारवाई करण्याचा संबंध येतोच कुठे? सगळे मिळून, मिसळून खावू असंच धोरण सुरू आहे.


अवैध धंदे बंद होवू शकत नाही?
अवैध धंदे बंद करा, असं काही पुढारी म्हणत असेल तर याचा अर्थ समजायचा या पुढार्‍याला कुठून काही मिळेना? ज्या पुढार्‍यांच्या आर्शिवादाने अवैध धंदे चालतात तो कधीच अवैध धंदे बंद करा असं म्हणत नाही. अवैध धंद्यांचे पाळेमुळे खोलवर आहेत. अवैध धंदे, राजकारण आणि भ्रष्टाचार हे एक समीकरण झालेलं आहे. यातून मोठी उलाढाल होते, राजकारण करायचं म्हटलं तर पैसा लागतो, पैसा कमवण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब केला जातो. एखादा चांगला अधिकारी अवैध धंद्याच्या मागे हातधुवून लागला तर त्या अधिकार्‍यांची बदली करण्यासाठी माफिया मंडळी थेट मंत्रालयापर्यंत मजल मारत असतात. मंत्र्यांना गळ घातली जाते व मोठी तडजोड करुन बदली करुन घेतली जाते. अनेक चांगल्या अधिकार्‍यांचा बळी अवैध धंद्यातून गेलेला आहे. पुढार्‍यांना आपल्या मतदार संघात सगळं काही आपल्या मनाप्रमाणे व्हावे असं वाटत असतं. आपला कार्यकर्ता मटका घेतांना, गुटखा विकतांना किंवा वाळू आणतांना पकडला तर त्याला सोडवण्यासाठी अधिकार्‍यावर दबाब टाकला जातो. अवैध धंद्याची ही साखळी पध्दत आहे. या साखळीत सगळेच सहभागी असतात. कुणीच धुतल्या तांदळाचा नाही. त्यामुळे मटका, गुटखा, वाळू, दारु यासारखे हे धंदे कधीच बंद होवू शकत नाही,आणि हे धंदे बंद व्हावेत असं राजकारणी, भ्रष्ट अधिकार्‍यांना वाटत नाही.

Most Popular

error: Content is protected !!