Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमचौसाळ्यातील आयडीया टॉवरचे वायर पळविले आठ दिवसांपासून मोबाईलला रेंज नाही

चौसाळ्यातील आयडीया टॉवरचे वायर पळविले आठ दिवसांपासून मोबाईलला रेंज नाही

चौसाळा (रिपोर्टर):- चौसाळा येथील आयडीया टॉवरचे केबल वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने गेल्या आठ दिवसांपासून चौसाळ्यातील आयडीया मोबाईलची रेंज गेली आहे. मोबाईलला रेंज नसल्याने येथील लोकांचा संपर्क बंद झाला आहे. सदरील टॉवर दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे. आठ दिवसांपुर्वी आयडिया टॉवरचे केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने येथील ग्राहकांचा नेटवर्क तुटला आहे. सदरील टॉवर दुरुस्त करण्यात आले नसल्याने लोकांचा सध्या संपर्क होत नाही. याबाबत संबंधित कंपनीने तात्काळ दखल घेऊन ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!