Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशिक्षक कॉलनीला गटाराचे स्वरुप संपुर्ण रस्त्यावर नालीचे पाणी

शिक्षक कॉलनीला गटाराचे स्वरुप संपुर्ण रस्त्यावर नालीचे पाणी


बीड (रिपोर्टर):- शहर बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या शिक्षक कॉलनीमध्ये गटारीचे घाण पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याच घाण पाणीतून नागरिकांना वाट काढत जावे लागते. येथील नागरिकांनी तुंबलेल्या नाल्या काढण्याची मागणी अनेक वेळा नगरपालिकेकडे केली मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील शिक्षक कॉलनी येथील नाल्या गेल्या अनेक वर्षांपासून काढलेल्या नाहीत. नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर साचले आहे. संपुर्ण रस्त्यालाच गटारीचे स्वरुप आल्याने याच घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढत जावे लागते. येथील नाल्या साफ करण्याची मागणी नगरपालिकेकडे अनेक वेळा नागरिकांनी केलेली आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या शिक्षक कॉलनी परिसरात संपुर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Most Popular

error: Content is protected !!