Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडरानमेवा म्हणजे सोन्याची खाण -जिल्हाधिकारी रानभाज्या निसर्गाची देण -सीईओ कुंभार

रानमेवा म्हणजे सोन्याची खाण -जिल्हाधिकारी रानभाज्या निसर्गाची देण -सीईओ कुंभार


बीड (रिपोर्टर)- रानभाज्या माणसाने खाल्ल्याच पाहिजे, पुर्वीपासून माणसाच्या आहारात रानभाज्यांचा वापर होत आलेला आहे त्यामुळे जुन्या काळातील माणसांची प्रकृती अगदी ठणठणीत असायची. रानभाज्या ही एक सोन्याची खाण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले. रानभाज्या महोत्सव आदिवासी भागांमध्ये आयोजीत केले जातात. कृषी विभागाने त्याच धर्तीवर बीड येथे महोत्सव आयोजीत करून एक चांगला पायंडा पाडला असल्याचे जि.प.चे सीईओ अजित कुंभार यांनी म्हटले आहे.

कृषी विभाग, केएसके कृषी कॉलेजच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी जगताप यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आयुर्वेदाचा पुर्वीपासून प्रभाव राहिलेला आहे.

235220923 1067571724046452 3560216469900722820 n

बदल्या परिस्थितीनुसार आपण बदललेलो आहोत. रानभाज्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. रानभाज्या खाल्ल्याने प्रकृती चांगली राहते. जुन्या माणसांची प्रकृती आपण पहात आलेलो आहोत. रान भाज्या म्हणजे सोन्याची खाण असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे तर जि.प.चे सीईओ म्हणाले की, रानभाज्या ही निसर्गाची देण असून विविध भाज्या पृथ्वी तलावर आहेत. त्याचा आपण त्या त्या ऋतूमध्ये आहारात वापर केला पाहिजे. रानभाज्या महोत्सव हे आदिवासी भागांमध्ये आयोजीत केले जातात. त्याच धर्तीवर कृषी विभागाने आपल्याकडे हा महोत्सव आयोजीत केला ही चांगली गोष्ट असून जेणेकरून या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना रान भाज्यांचे महत्व कळेल. दरम्यान या महोत्सवाला कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. या ठिकाणी विविध रानभाज्या आणण्यात आल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!