Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडनूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा दुपारी पदभार घेणार

नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा दुपारी पदभार घेणार

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हाधिकारीपदी नव्यानेच नियुक्त झालेले राधाबिनोद शर्मा हे आज दुपारी आपल्या पदाचा पदभार घेणार आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य सरकारने त्णयांच्या जागी हिंगोली येथील जिल्हा परिषद सीईओ राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती केली आहे. राधाबिनोद शर्मा हे 2012 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून ते अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. सोबतच त्यांचे सर्व शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय येथून झाले आहे. मणीपूर येथील एका ग्रामीण भागातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. बीड येथील पदभार स्वीकारल्यानंतर महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये झालेली अनियमितता, बीड बायपास मार्गावर झालेले बोगस एनए, या बोगस एनए धारकांना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पाठिशी घातले होते. याही बाबीकडे नूतन जिल्हाधिकार्‍यांना लक्ष द्यावे लागणार आहे तर 2012 ते 2018 या कालावधीत बीड पंचायत समिती अंतर्गत नरेगा घोटाळ्यामुळेच जिल्हाधिकारी जगताप यांची बदली झाल्यामुळे शर्मा यांना प्राधान्याने या बाबीकडे फोकस करावा लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!