Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाशासनाच्या निर्णयाला टास्क फोर्सचा विरोध 17 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या शाळा बंदच

शासनाच्या निर्णयाला टास्क फोर्सचा विरोध 17 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या शाळा बंदच

मुंबई (रिपोर्टर)- कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या 17 ऑगस्टपासूनशाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. टिास्क फोर्सनं शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता. मात्र आता राज्य सरकारने शाळा सुरु होण्याबाबत जो निर्णय घेतला होता त्या जीआरला स्थगिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी शाळा सुरू होण्याबाबत आक्षेप घेतला होता. शाळा सुरू झाल्यावर कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली होती. मात्र शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यावर भर दिला. पालकांकडून शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाने सर्व्हे घेतला होता. त्यात 80 टक्के पालकांनी शाळा सुरु कराव्यात असा कौल दिला होता. सर्व्हेच्या आधारावर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तुर्तास हा निर्णय थांबवला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षण विभागाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आता 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीत. शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवऱ 17 तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी जे आदेश काढले होते, त्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येतील यावरही तातडीने निर्णय घेतला जाईल. मात्र लगेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेता येणार नाही असं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यात सलग तीन आठवडे एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, असे शहर किंवा जिल्हे शाळा सुरू करण्यासाठी पात्र धरावेत, अशी ही चर्चा टास्क फोर्सच्या बैठकीत झाली. पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या प्रमुखांनी जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचाही अभ्यास करून तातडीने त्याची माहिती गोळा करण्याचे आदेश आपण दिल्याचे कुंटे यांनी सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!