Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसबीडमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा; 600 महिला, पुरूष धावले

बीडमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा; 600 महिला, पुरूष धावले

बीड (रिपोर्टर)ः- आजच्या धकधकीच्या जिवनामध्ये मानसांचा व्यायाम कमी झाला आहे. आरोग्याच्या सदृढतेसाठी बीड येथील चंपावती क्ल, योगा ग्रुपने राज्यस्तरीय मॅरेथान स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धेमध्ये परभणी,जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि बीड मधील विविध गटाचे रणर सहभागी झाले होते. जवळपास 600 महिला-पुरूष आजच्या स्पर्धेमध्ये धावले. स्पर्धकांना विविध गटात दोन प्रथम व द्वितीय ट्रॉफी देवून सन्मानीत करण्यात आले.

t2
t3
t4

चंपावती क्लब, योगा ग्रुपने प्रशांत माने यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धेमध्ये बीड शहरासह सर्व तालुक्यातील व परभणी, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद येथील रणर सहभागी झाले होते. 10 कि.मी. व 21 कि.मी. धावणे अशी ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये 1 ते 18, 18 ते 50, 50 वर्षावरिल महिला व पुरूष असे जवळपास 600 जण सहभागी झाले होते.

t5

यातील प्रत्येक वयोगटात दोन प्रथम, व दोन द्वितीय स्पर्धकांना ट्रॉफी देवून सन्मानीत करण्यात आले. आजच्या धकधकीच्या जिवनामध्ये मानसांचा व्यायाम कमी झाला. आरोग्याच्या सृदढतेसाठी सदरील स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेला बीडकरांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला असल्याचे सि.ए.बी.बी.जाधव व डॉ.अनिल थोरात यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!