Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडना. मुंडेंचा शेतकर्‍यांसाठी बैठकीत रुद्रावतार, बँक अधिकार्‍यांना झापले, प्रत्येक बँकेने चार दिवसात...

ना. मुंडेंचा शेतकर्‍यांसाठी बैठकीत रुद्रावतार, बँक अधिकार्‍यांना झापले, प्रत्येक बँकेने चार दिवसात आकडेवारी सादर करावी

जिल्हा ऑक्सिजनसाठी स्वावलंबी झाला पाहिजे, ग्रामीण भागात ऑक्सिजन बेड उभारा, महात्मा फुले योजनेचा लाभ रुग्णांना मिळाला का? ऑडीटचा लेखी खुलासा करा, हॉटस्पॉट बनलेल्या तालुक्यात बाहेर जिल्ह्यातून येणार्‍यांची चाचणी करा, चेकपोस्ट उभारा, बँकेच्या समोर शेतकरी उपोषणाला बसतात हे लाजीरवाणे, शेतकरी वेडे आहेत का बँक अतिशहाणी आहे? कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज द्यायला काय अडचण म्हणत


बीड (रिपोर्टर):- मंजूर असलेल्या चार ऑक्सिजन प्लान्टचे काम तातडीने पूर्ण करून घ्या, बीड जिल्हा ऑक्सिजनसाठी पुर्णपणे स्वावलंबी झाला पाहिजे. जिल्ह्यातील रुग्णवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करा, आष्टी, पाटोदा, शिरूर तालुके हॉटस्पॉट बनत आहेत. या ठिकाणी अन्य जिल्ह्यातून येणार्‍या लोकांचे अँटीजेन टेस्ट केल्याशिवाय त्यांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नका, चेकपोस्ट पुन्हा कार्यान्वित करा, ग्रामीण भागातील रुग्णालयात ऑक्सिजनच्या दोन लाईन टाकून ऑक्सिजन बेड उभारा, डॉक्टरची उपलब्धता तात्काळ करून द्या म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नेकनूर, रायमोह, चिंचवण या ठिकाणी ऑक्सिजन बेड प्रस्तावीत करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळाला का? असे विचारत कृषी कर्जाबाबत बँक व बँकेच्या लिड अधिकार्‍यांना कर्ज वाटपा प्रकरणी झाप-झाप झापले. कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज द्यायला काय अडचण आहे, असा सवाल विचारत शेतकरी वेडे आहेत का? बँका अती शहाण्या झाल्यात का? असं बोलत ना. मुंडेंनी शेतकर्‍यांसाठी रुद्रावतार घेतला.

t7
t8
t7 1


    राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. या वेळी बैठकीला आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त जिल्हाधिकारी ठोंबरे यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री धनंजय मुंडे आज अधिक आक्रमक असल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांसह कोविडचा आढावा घेताना धनंजय मुंडेंनी अधिकार्‍यांना झाप झापले. बैठकीच्या सुरुवातीलाच कोविडचा आढावा घेत ऑक्सिजनसाठी जिल्हा स्वावलंबी झाला पाहिजे यासाठी मंजूर ऑक्सिजन प्लान्टचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या त्यांनी या वेळी दिल्या. नेकनूर, रायमोह, चिंचवण या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात शासनाचे दिशा निर्देश अभ्यासून ऑक्सिजन बेड उभारा, तिथे डॉक्टरांची उपलब्धता करून द्या, असे सांगत महात्मा फुले योजनेतील कोविड हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळाला का? अवाजवी बिलाच्या तक्रारीबाबत ऑडीट केले का? या आधी निर्देश दिले होते, त्या ऑडीटचा लेखी खुलासा द्या, असे म्हणत आष्टी, पाटोदा, शिरूर हे तीन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असल्याने या तिन्ही तालुक्यात परजिल्ह्यातून येणार्‍या प्रत्येकाची अँटीजेन टेस्ट करा तेव्हाच त्यांना प्रवेश द्या, त्यासाठी चेकपोस्ट पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना धनंजय मुंडेंनी या वेळी दिल्या. कृषी विभागाचा आढावा घेताना धनंजय मुंडे अधिकच आक्रमक दिसले. पीक कर्जासाठी शेतकरी बँकेच्या समोर उपोषणाला बसत असतील तर हे लाजीरवाणे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 25 जुलै रोजी बीडला आले होते. त्यांनी शंभर टक्के कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले होते. आज केवळ 55 टक्के कर्जवाटप झाले आहे. शेतकरी बँकेच्या दारात कर्ज मागण्यासाठी बसत आहेत. ते वेडे आहेत का? बँक अतिशहाणी आहे का? कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज द्यायला काय अडचण आहे? असे म्हणत ना. मुंडेंनी बँक व बँकेच्या लिड अधिकार्‍यांना चांगलेच झापत त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.कर्ज माफी मिळालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज देण्याबाबतची प्रत्येक बँकेची शाखानिहाय आकडेवारी चार दिवसात सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.  शेतकर्‍यांसाठी धनंजय मुंडे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. कृषी आढाव्यानंतर जिल्ह्याच्या अन्य कामांचा आढावा ना. मुंडे घेणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!