Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमदुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल केला लपंास तक्रारदारालाच पोलिसांनी सुनावले

दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल केला लपंास तक्रारदारालाच पोलिसांनी सुनावले


बीड (रिपोर्टर):- शहरातील सांगली बँकेजवळ फोनवर बोलत असलेल्या इसमाचा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारालाच शहर पोलिसांनी चांगलेच सुनावले.
नितीन दामोधर कुलकर्णी (रा. छापखाना गल्ली, धोंडीपुरा बीड) हे परवा सांगली बँक कॉर्नरजवळ मोबाईलवर बोलत असताना. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी ते शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता तुम्हाला तुमचा मोबाईल सांभाळता येत नाही का? तुम्ही चोरट्याला कसे काय पाहिले नाही, तुम्ही गाडी नंबर का घेतला नाही? स्वत:चा मोबाईल निट सांभाळता येत नाही आणि चालले पोलिस ठाण्यात अशा एक ना अनेक प्रश्‍नांचा भडीमार कुलकर्णी यांच्यावर केला. शेवटी दुसर्‍या दिवशी त्यांची तक्रार नोंदवून गेतली. तर दुसरीकडे फिर्यादीने याच चोरट्याने आमचा मोबाईल चोरला तरी पोलिस त्या चोरट्याला अटक करत नाहीत. यावरून हा चोर-पोलिसांचा खेळ सर्वसामान्यांच्या खिशाला दरोडा (पान ७ वर)
टाकणारा ठरत आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी लक्ष देऊन शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून भुरट्या चोरट्यांना अभय तर मिळत नाही ना याची चौकशी करणे गरजेचे आहे.

Most Popular

error: Content is protected !!