Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी सचीन जाधव

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी सचीन जाधव

जीवनराव गोरे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
बीड (रिपोर्टर):- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बीड शहराध्यक्षपदी सचीन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जीवनराव गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.


यावेळी आ. संदीप क्षीरसागर, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
सचीन जाधव यांचे कार्य पाहून त्यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बीड शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. उषाताई दराडे, माजी आ. सुनिल धांडे, सय्यद सलीम, प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी के.के. वडमारे, बजरंग सोनवणे, जयसिंह सोळंके, खुर्शीद आलम यांच्यासह आदींची उपस्थिती होती. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!