Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडहायवेसाठी जमीन संपादीत, शेतकर्‍यांना अद्याप मावेजा नाही शेतकर्‍यांचे रस्ता रोको आंदोलन

हायवेसाठी जमीन संपादीत, शेतकर्‍यांना अद्याप मावेजा नाही शेतकर्‍यांचे रस्ता रोको आंदोलन


धारूर (रिपोर्टर):- धारूर तालुक्यातील चोरांबा येथील सर्वे नं. १९ मधील काही शेतकर्‍यांच्या जमीन हायवेसाठी संपादीत करण्यात आल्या. मात्र या शेतकर्‍यांना अद्यापही मावेजा मिळाला नाही. शेतकर्‍यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे खेटे घातले. मात्र प्रशासन याची दखल घेत नाही यामुळे आरणवाडी तलावाजवळ शेतकर्‍यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

राष्ट्रीय महामार्ग ५४८ – सी साठी चोरांबा येथील सर्वे नं. ११९ मधील शेतकर्‍यांची जमीन संपादीत करण्यात आली. नवीन कायद्यानुसार एक वर्षाच्या आत शेतकर्‍यांना जमीनीचा मोबदला मिळावा, असे असताना अद्यापही शेतकर्‍यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही. मावेजासाठी शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा खेटे घातले. याची दखल प्रशासन घेत नसल्याने आज शेतकर्‍यांनी आरणवाडी तलावाजवळ रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या वेळी माणिक चव्हाण, नारायण चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह आदी शेतकर्‍यांचा सहभाग होता. तहसीलदारांनी घटनास्थळी जावून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!