Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeदेश विदेशअपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या'...

अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या ‘त्या’ विमानाचा थरार

नवी दिल्ली : विमान काबुलमध्ये उतरल्यास अपहरणाची भीती, न उतरल्यास 124 भारतीयांचा जीव धोक्यात, लॅन्डिंग क्लियरन्ससाठी आकाशात 12 चकरा, त्यामुळे इंधन संपण्याची भीती. अशा सर्व अडचणींचा सामना करत एयर इंडियाचे अफगाणिस्तानला गेलेलं AI-243 हे शेवटचं विमान अखेर काल रात्री सुखरुपपणे भारतात दाखल झालं.

अफगाणिस्तानमधील भारतीयांना सुखरुपपणे परत आणण्यासाठी पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर करुन गेलेले एअर इंडियाचे AI-243 हे शेवटचे विमान काल रात्री उशीरा दिल्लीमध्ये पोहोचलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अफगाणिस्तानवर आता तालिबान्यांनी नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर काबुल ते दिल्ली दरम्यानचं हे एअर इंडियाचे शेवटचे उड्डाण होतं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले असून राष्ट्रपती भवनावर आता तालिबानी दहशतवाद्यांचा कब्जा आहे.

Most Popular

error: Content is protected !!