Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकराडांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
पंकजा संतापल्या, तुमच्यामुळे त्रास होतोय, म्हणत कार्यकर्त्यांना सुनावले
परळी (रिपोर्टर):- भाजपाचे केेंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज गोपीनाथ गडावरून निघाली असून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या यात्रेचा शुभारंभ झाला. या वेळी माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे या उपस्थित होत्या. मात्र या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे पंकजा मुंंडे चांगल्याच संतापल्या. तुमच्या बालीशपणाचा मला त्रास होतो, मुर्ख कुठले, अशा घोषणा द्यायच्या असतील तर माझ्या दारात यायचं नाही, असेही पंकजा मुंडेंनी या वेळी कार्यकर्त्यांना सुनावले.
केंद्रीय मंत्रिमंडळात दाखल झालेल्या मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढत नागरिकांना मोदी सरकारच्या कामाची माहिती द्यावी, असे या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळात डेरेदाखल झालेले औरंगाबाद येथील भागवत कराड यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेला परळी येथून सुरुवात केली. लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजपाचा ध्वज दाखवत या यात्रेला सुरुवात केली. या वेळी खा. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. मात्र याच वेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकातून प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे यासह अनेक घोषणा देण्यात आल्या. या वेळी पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना झापत चुकीच्या घोषणा देणार्‍यांना मी बोलणार नाही, हे ‘अंगार बिंगार’ काय आहे? हे संस्कार आहेत का आपले? मी असल्या घोषणा द्यायला सांगतेय का? तुमच्यामुळे मला त्रास होतो, मुर्ख कुठले, अशा घोषणा द्यायच्या असतील तर माझ्या दारात यायचे नाही, असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

Most Popular

error: Content is protected !!