Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकलेक्टर रविंद्र जगतापांना फटका बसल्यानंतरही तडजोडीचा खटका शासकीय निवासस्थानी चार दिवस गर्दी...

कलेक्टर रविंद्र जगतापांना फटका बसल्यानंतरही तडजोडीचा खटका शासकीय निवासस्थानी चार दिवस गर्दी कशाची? सीसीटीव्ही फुटेज तपासा, बॅकडेटमध्ये सह्या केलेल्या

कलेक्टर रविंद्र जगतापांना फटका बसल्यानंतरही तडजोडीचा खटका
शासकीय निवासस्थानी चार दिवस गर्दी कशाची? सीसीटीव्ही फुटेज तपासा, बॅकडेटमध्ये सह्या केलेल्या
फाईली शोधा
बीड (रिपोर्टर):- तत्कालीन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अकार्यक्षमतेमुळे न्यायालयाच्या आदेशावरून बदली झाली खरी, परंतु जिल्हाधिकारी पदाचा चार्ज दुसर्‍याकडे दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांच्या कालखंडात रविंद्र जगताप यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. या तीन दिवसांच्या कालखंडात बॅकडेटमध्ये अनेक फाईलिंवर जगताप यांनी सह्या केल्याचे सांगितले जात असून या सर्व फाईली आर्थिक तडजोडीच्या असल्याचा गंभीर आरोप होत आहे. हायवेमध्ये गेलेल्या जमिनीच्या मावेजाबाबत एनए बाबत या फाईली असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. जिल्हाधिकारी पदावर नसताना मागील तारखात आर्थिक तडजोडीतून काम करणार्‍या रविंद्र जगतापांची उच्चस्तरीय चौकशी करत गेल्या तीन दिवसांच्या कालखंडातले निवासस्थानचे सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाने तात्काळ हस्तगत करत त्या सीसीटीव्हीमध्ये दिसणार्‍या लोकांचे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल असणार्‍या लोकांची ओळख परेड करत दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी करावे, अशी मागणी होत आहे.
बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच जिल्हाधिकार्‍यांची बदली हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून झाली. रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा ठपका न्यायालयाने रविंद्र जगताप यांच्यावर ठेवला. जगताप हे अकार्यक्षम असल्याचेही सांगण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या आठवडाभरात शासनाने या ठिकाणी नवीन कलेक्टर दिले. १२ ऑगस्ट रोजी रविंद्र जगताप यांनी राधाबिनोद शर्मा यांना बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा चार्ज दिला. मात्र १२ ते १६ ऑगस्टच्या दरम्यान रविंद्र जगताप यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी बॅकडेटमध्ये अनेक फाईलींवर सह्या केल्या. या सर्व फार्सल तडजोहीच्या आणि मलाईच्या असल्याचे सांगितले जाते. १२ ते १६ च्या दरम्यान जगतापांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती. जे लोक त्या ठिकाणी गेले त्यांचे कुठले ना कुठले अवैध काम वैध करण्याहेतु गेल्याचे दिसून येते. हायवेमध्ये ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत त्याचा अधिक मावेजा मिळावा म्हणून एनए स्वरुप करण्याहेतु अनेकांनी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांशी हातमिळवणी केल्याचेही बोलले जाते. या चार दिवसातला शासकीय निवासस्थानातला सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाने हस्तगत केला आणि त्यातल्या लोकांची ओळख परेडे करत जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या फाईल पाहितल्या तर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल. जगताप यांच्या या कार्यप्रणालीविरोधातही काही जण न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येते. तत्पुर्वी नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत जुन्या प्रत्येक फाईलीबाबत साशंक नजरेने पहात तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या गौडबंगालाचा पर्दाफाश करावा.

Most Popular

error: Content is protected !!