Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडअवघा देश स्वातंत्र्य उत्सव साजरा करत होता बीडचे अभियोक्ता कार्यालय मात्र बंद

अवघा देश स्वातंत्र्य उत्सव साजरा करत होता बीडचे अभियोक्ता कार्यालय मात्र बंद

अवघा देश स्वातंत्र्य उत्सव साजरा करत होता
बीडचे अभियोक्ता कार्यालय मात्र बंद
बीड (रिपोर्टर):- स्वातंत्र्याची पंच्याहत्तरावी अवघ्या देशात मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच बीडमध्ये मात्र सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण झाले नसल्याचे दिसून येत असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अखंड भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला देशभरात अनन्यसाधारण महत्व होतं. १५ ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमाच्या रेलचेलसह ठिकठिकाणी तिरंगा ध्वज फडकवत अभिमानाने सलामी देण्यात आल्या. स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला मात्र बीड शहरात एसपी ऑफीसपासून काही अंतरावर असलेल्या रहेमतनगर या ठिकाणी जे सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय आहे येथे मात्र ध्वजारोहण झाले नाही. येथील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी ध्वजारोहण न करता सुट्टीचा आस्वाद घेतला. सदरचे प्रकरण हे गंभीर असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!