Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedकोरोना लसीचे दोन डोस घेणार्‍यांनाच शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश १८ वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये...

कोरोना लसीचे दोन डोस घेणार्‍यांनाच शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश १८ वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेश करताना ओळखपत्र दाखवावे लागणार; आजपासून अंमलबजावणी


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. १५ ऑगस्टपासून राज्यात १० वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सर्व व्यवहार सुरू ठेवण्यात आले असले तरी नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सक्तीच्या सूचना जिल्हा प्रशासनाला शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. आता शॉपींग मॉलमध्ये प्रवेश करणार्‍या आणि तेथील कर्मचार्‍यांना कोरोना लसीचे दोन डोस घेेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे प्रमाणपत्र त्यांना बाळगावे लागणार आहे. त्याचबरोबर अठरा वर्षाखालील मुलांना शॉपींग मॉलमध्ये प्रवेश करत असताना वयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक केले असून या आदेशाची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे.
राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शॉपींग मॉलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आणि शॉपींग मॉलमध्ये जाणार्‍यांना कोरोनाचे दोन डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवेशासाठी दुसरा डोस घेऊन १४ दिवस होणे गरजेचे आहे. मॉलमध्ये जाताना लसीकरणाचे प्रमाणपत्र त्या समवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू न झाल्याने १८ वयाच्या खालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा, महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. सदरील ही अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी काढले आहे.

आजच्या अहवालात १०७ बाधीत
आरोग्य विभागाने गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णांच्या तपासण्या सहा ते सात हजाराच्या पुढे नेल्या होत्या. तेव्हा बीड जिल्ह्यात २०० च्या आसपास रुग्ण आढळून यायचे मात्र कालपासून कोरोना चाचण्या या ४ हजाराच्या जवळपास होत असल्याने पॉझीटिव्ह रुग्णांचा आकडाही १०० च्या जवळपास आहे. आज आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात १०७ पॉझीटिव्ह आढळून आले. काल दिवसभर विविध तालुक्यातून ४ हजार ६१७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये ४ हजार ५१० जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई पाच, आष्टी २३, बीड २४, धारूर ५, गेवराई ३, केज १९, माजलगाव १, परळी १, पाटोदा १०, वडवणी १० आणि शिरूर तालुक्यात ६ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!