Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडधारूरअरणवाडी साठवण तलावाच्या कामात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याबाबत गुत्तेदारास नोटीस

अरणवाडी साठवण तलावाच्या कामात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याबाबत गुत्तेदारास नोटीस


किल्ले धारूर (रिपोर्टर):- अरणवाडी साठवण तलावाचे राहिलेले उर्वरित काम मागील दीड वर्षाच्या कालावधीत बीड येथील अमोल कंट्रक्शन या कंपनीमार्फत करण्यात आले आहे, परंतु या कंपनीने अरवाडी येथील गायरान जमिनीतून विनापरवानगी गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी गुत्तेदार अस ४ कोटी ४४ लाख रुपयांची नोटीस बजावण्यात आली असून गुत्तेदाराने राहिलेली उर्वरित रक्कम न भरल्यास गुत्तेदार यांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर रकमेचा बोजा नोंद घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार यांनी दिलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे .
तालुक्यातील १५ मागील पंधरा वर्षापासून रखडलेल्या अंरणवाडी साठवण तलावाचे उर्वरित काम बीड येथील अमोल कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळाले होते . त्यांनी मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सदरील काम पूर्ण केले आहे . परंतु काम करताना सदरील गुत्तेदाराने अरणवाडी, चोरांबा शिवारातील ११६ गट नंबर मधील गायरान जमिनीतून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करण्यात आलेले आहे . यामुळे त्याची येथील तहसील प्रशासनाने पाहणी व मोजमाप करून दंड दंडात्मक कारवाई अनुसरून गुत्तेदारास नोटीस देण्यात आलेली आहे . या नोटिशीमध्ये उत्खननाचे ठिकाणी चोरंबा हद्दीमध्ये असून त्याची धारूर भूमी अभिलेख यांच्यामार्फत मोजणी करण्यात आली होती . यामध्ये ७ हजार २८४ ब्रास इतका मुरूम उत्खनन करण्यात आलेला होता . सदरील मुरूम हा वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन करण्यात आलेले होते . यामुळे गुत्तेदारास चार कोटी ४४लाख ३७ हजार १३० इतकी रक्कम दंडात्मक रक्कम
आकारण्यात आलेली होती . याबाबत तीन वेळा संबंधित ठेकेदारास नोटीस देण्यात आलेली आहे . गुत्तेदाराने पुवीच्या नोटीशीचे उत्तर दिले होते परंतु ते असमाधानकारक असल्याचे तहसील प्रशासनाने म्हटले आहे . यामुळे आता गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून या संबंधित १० ऑगस्ट रोजी दंडा सहित रक्कम भरण्यासाठी गुत्तेदारास नोटीस काढण्यात आलेली आहे . या नोटिशीमध्ये तीन दिवसाच्या आत रक्कम न भरल्यास आपल्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर सदर रकमेचा बोजा नोंद घेणे बाबत कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे . यामुळे आता मतदारांमध्ये खळबळ उडाली असून तहसील प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे . यातील २ कोटी १८ लाख रुपयांची रक्कम गुत्तेदाराने यापूर्वी भरल्याचे ही तहसील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे . परंतु उर्वरित रक्कम भरून घेण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी सांगितले.
अमोल कन्स्ट्रक्शन या कंपनीने महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता गौण खनिजाचे उत्खनन केले होते याप्रकरणी कंपनीस दंड लावण्यात आला असून याबाबत कंपनीला नोटीसही पाठविण्यात आली आहे उर्वरित रक्कम सदरील कंपनीला भरण्याचे नोटिशी द्वारे सूचित केले आहे जर त्यांनी ते भरली नाही तर त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल
– रामेश्वर स्वामी
नायब तहसीलदार धारूर

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!