Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडएसपी राजारामा स्वामींच्या राज्यात सीतामाईची अब्रू धोक्यात, साखरे बोरगावात ११ वर्षाच्या मुलीवर...

एसपी राजारामा स्वामींच्या राज्यात सीतामाईची अब्रू धोक्यात, साखरे बोरगावात ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार


बलात्कार करताना नराधमास गावकर्‍यांनी रंगेहात पकडलेसंतापजनक घटनेने जिल्हा हादरला
नराधमास राष्ट्रवादीच्या हेमा पिंपळेंनी चपलीने बदडले

बीड/नेकनूर (रिपोर्टर):- जिल्हा पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांच्या कार्यकाळामध्ये बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले असून पोलीस केवळ अवैध धंद्यांसह वाळू माफियांचा मलिदा गोळा करण्यात मश्गुल असल्याने गुन्हेगारी वृत्तीचे लोक गंभीर गुन्ह्यांना अंजाम देत असल्याचे सातत्याने उघड होत असून नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरे बोरगावात संतापजनक घटना उघडकीस आली. ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेतात बलात्कार करताना गावकर्‍यांनी एका नराधमास रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गावकर्‍यांनी त्याला बेदम चोप दिला तर आज सकाळी राष्ट्रवादीच्या हेमा पिंपळे यांनी या नराधमास चपलेने बदडले. सदरच्या घटनेने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर सर्वस्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपीला आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.


बीड शहरातील विद्यानगर, दिव्या गार्डनसमोर राहणारा विक्रम भगवान पवार (वय २४) हा नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या साखरे बोरगाव येथे असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे गेला होता. या नराधम आरोपीची नजर शेजारी असलेल्या एका ११ वर्षाच्या मुलीवर गेली. नराधमाने मुलीला काल सायंकाळच्या दरम्यान बाजुला असलेल्या एका मक्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार गावातील लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर काही लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन या नराधम आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रात्री नऊ वाजता नराधम आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने नेकनूर येथे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डीवायएसपी लगारे, एएसआय कोळी मॅडम या करत आहेत. घटनेची माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या ऍड. हेमा पिंपळे यांना झाल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत नेकनूर पोलिस ठाणे गाठले. आरोपीला बीडच्या न्यायालयामध्ये घेऊन जात असताना आरोपीच्या दिशेने चप्पल भिरकावत त्याला चपलाने मारले. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राजारामा स्वामी आल्यापासून मटका, जुगार, वाळू माफियांनी धुमाकूळ घातला त्याचबरोबर महिला, मुली जिल्ह्यात सुरक्षित नाहीत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!