Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमनाहोलीत विवाहित महिलेचा खून? मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईला पाठविला

नाहोलीत विवाहित महिलेचा खून? मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईला पाठविला


इनकॅमेरा शवविच्छदन करण्याची माहेरच्यांची मागणी
केज (रिपोर्टर):- माहेरहून पैसे का आणत नाही? यासाठी एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा सासरच्या मंडळीकडून सातत्याने छळ होत असे. रात्री महिलेस तिच्या पतीने बेदमपणे मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. आमच्या मुलीला तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी मारले असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत महिलेच्या माहेरच्या लोकांनी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविला असून शवविच्छेदन इनकॅमेरा करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही घटना नाहोली येथे घडली.
कल्पना दत्तात्रय झाडे (वय ३०, रा. नाहोली ता. केज) या महिलेचा विवाह २०१४ साली दरम्यान झाला होता. लग्नानंतर सासरचे लोक पैशासाठी तिच्याकडे तगादा लावत होते. पैसे आणत नसल्याने महिलेवर सातत्याने अन्याय केला जात होता. रात्री तिच्या नवर्‍याने कल्पना हिला बेदम मारहाण केली. यामध्ये ती मयत झाली. सकाळी माहेरच्यांना ही घटना कळविण्यात आली. महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत असून हा प्रकार खुनाचा आहे. या प्रकरणी पती व सासरच्या लोकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कल्पना हिच्या माहेरच्या लोकांनी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविला असून शवविच्छेदन इनकॅमेरा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!