Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमशिक्षकाचे घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास

शिक्षकाचे घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास


आष्टी (रिपोर्टर):- शेतात राहणार्‍या शिक्षकाचे अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नगदी रकमेसह सोने असा एकूण १ लाख ९५ हजार ४३८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.
रमेश देवराव तळेकर (रा. टाकळी आमिया ता. आष्टी) हे शिक्षक टाकळी आमिया येथील त्यांच्या शेतवस्तीवर राहतात. काल रात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले २३ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९५ हजार ४३८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी आष्टी पोलिसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे हे करत आहेत.

सुलेमान देवळ्यात मजुराचे घर फोडले
बीड (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील भाऊसाहेब नानाभाऊ घोडके या मजुराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले असून घरातील १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!